चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देशातील सर्वात जुन्या शिवसैनिकांपैकी एक असणारे तुकाराममामा कोळी यांचे निधन झाल्याने एक सच्चा निष्ठावान कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेनेची स्थापना केल्यानंतर तेव्हा नवतरूण असणारे असणारे चाळीसगाव येथील तुकाराम कोळी यांना त्यांचे प्रखर विचार भावले. काही महिन्यातच ते शिवसैनिक बनले. तर यानंतर दोन वर्षात अर्थात १९६८ साली त्यांनी चाळीसगावात शिवसेनेची शाखा सुरू केली. ही खान्देशातील शिवसेनेची पहिली शाखा होय. यानंतर सगळीकडे शिवसेनेचा प्रचार-प्रसार झाला.
तुकाराममामा कोळी हे निष्ठावंत शिवसैनिक होते. १९६६ पासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत ते एक नेता, एक विचार, एक झेंडा यांच्याशी प्रामाणिक राहिले. त्यांनी घडविलेले अनेक जण पुढे, आमदार, खासदार, मंत्री वा विविध पदाधिकारी बनले. मात्र तुकाराममामा आहे तिथेच राहिले. अलीकडच्या काळात शिवसेनेत पडलेली फूट ही त्यांना अस्वस्थ करणारी ठरली होते. काल सायंकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने शिवसेनाच नव्हे तर सर्व पक्षांसह समाजाच्या सर्व स्तरांमधून संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी लाईव्ह ट्रेंडस न्यूजने त्यांच्य ासोबत विशेष वार्तालाप साधला होता. आपण खालील व्हिडीओ याला पाहू शकतात.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1155506081836709