अमळनेर प्रतिनिधी । खान्देश माळी समाज महासंघाची बैठक येथे उत्साहात पार पडली असून यात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
खान्देश माळी महासंघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर महाजन होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये संतोष इंगळे, अरूण चौधरी, प्रा एस. टी. चौधरी, मधुकर रोकडे, गजानन महाजन, सरिता नेरकर, अनिल बोरसे, रामू सैनी, योगेश माळी, बी. एस जाधव, जयंत खैरनार , ज्ञानेश्वर महाजन, दिलिप माळी आदींचा समावेश होता.
या बैठकीत येणार्या ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सालाबादप्रमाणे क्रांती-ज्योती बहुउद्देशिय संस्थेस सोबत घेऊन काढण्यावर चर्चा झाली. तसेच लवकरच समाज मंगल कार्यालय बांधण्या बद्दल सुद्धा महत्वपूर्ण चर्चा झाली. सर्व प्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. ही बैठक खान्देश माळी महासंघ औद्योगिक आघाडी जिल्हा अध्यक्ष रवींद्र माळी यांच्या कार्यालयात झाली. यावेळी धुळे जिल्ह्यातील व जळगाव जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी ते साठी रविंद्र माळी व वसंत पाटील यांनी प्रयत्न केले.