डोंगरकठोरा गावात जंतुमिश्रीत पाणी पुरवठा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा गावात जंतुमिश्रीत पाणी पुरवठा करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या बाबत ग्रामस्थांकडुन मिळालेली माहीती अशी की, डोंगर कठोरा येथील ग्राम पंचायत च्या माध्यमातुन गावात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असतो. २४ मार्च रोजी सायंकाळी गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन जंतु मिश्रीत पाणी सोडण्यात आले. ग्रामस्थांच्या निर्दशनास ही बाव आल्याने जंतु मिश्रीत पाण्याचे भांडे घेवुन संतप्त ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत जाब विचारला. मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

या संदर्भात ग्रामपंचायत सुत्राकडुन मिळालेल्या माहीती अनुसार गावातील काही भागात मध्येच पाईपलाईन फुटल्याने गटारीचे पाणी मिश्रीत होवुन नळाद्वारे जंतूमिश्रीत पाणी पुरवठा झाला असावा असे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने ती फुटलेली पाईपलाईन दुरूस्त करण्याचे काम आज युध्दपातळीवर करण्यात येणार असल्याची माहीती मिळाली आहे. मात्र अचानक नळांना जंतु मिश्रीत पाणी आल्याने नागरीकां मध्ये आरोग्य विषयी भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या बाबत डोंगर कठोरा गावातील ग्रामस्थानी यावल पंचायत समिती चे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे यांना हा प्रकार कळविला आहे.

Add Comment

Protected Content