बोदवड – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जलचक्र येथील खडसे खडसे समर्थकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मयुर शिवाजी पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
ईश्वर शेळके, पंडित घुले, अजय पाटील, अक्षय पाटील ,भारत पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला. यावेळी बंटी पाटील, धनराज पाटील, नितीन पाटील, मुकेश बरडे, गणेश धांडे , रमजान मुलतानी, फिरोज मुलतानी, अय्युब मुलतानी, निसार मुलतानी ग्रामस्थ उपस्थित होते.
जलचक्र हे खडसे समर्थक जि.प. सदस्याचे गाव आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत पूर्ण होत आहे. तरी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा होत असतांना खडसे गटाला हा धक्का मानण्यात येत आहे. बोदवड नगरपंचायतीचा एतिहासिक विजय संपादन केल्यानंतर शिवसेनेची आता ग्रामीण भागामध्येही पाय रुजवण्यास सुरूवात झाली आहे.
यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई , अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अफसरभाई खान, बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, माजी नगराध्यक्ष सईद दादा बागवान, माजी ऊपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिनेश माळी, माजी ऊपनगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन चव्हाण, नगरसेवक सुनिल बोरसे, शहरप्रमुख तथा नगरसेवक हर्षल बडगुजर, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक गोलू बरडिया, माजी नगरसेवक देवेंद्र खेवलकर यांच्यासमवेत शिवसैनिक उपस्थित होते.