थेट प्रदेश स्तरावरून खडसेंचा गेम करायची खेळी?

pawar khadse

 

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून अनपेक्षितरित्या राष्ट्रवादीने आपला अधिकृत उमेदवार मागे घेत शिवसनेच्या बंडखोर उमेदवाराला पुरस्कृत केले आहे. परंतू या निर्णयाबाबत राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी अनभिज्ञ असल्यामुळे एकनाथराव खडसेंचागेम करायची खेळी थेट प्रदेशस्तरावरून खेळली जात असल्याचे स्पष्ट आहे.

 

आज माघारीच्या शेवटच्या दिवशी अचानक प्रदेशस्तरावरून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना माघार घेण्यास सांगण्यात आले. प्रथमदर्शनी दुसरे उमेदवार विनोद तराळ हे उमेदवार असू शकतील,असे वाटत होते. परंतू प्रदेश स्तरावरून चक्क दोघांना माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील यांना पुरस्कृत उमेदवार केल्याची घोषणा सायंकाळी उशिरा प्रदेश निरीक्षक करण खलाटे यांनी केली. एकंदरीत खडसेंची कोंडी करण्याची खेळी ही प्रदेशस्तरावरून करण्यात आली असल्याचे स्पष्ट आहे. जर ही खेळी स्थानिक स्तरावरून राहिली असती, तर स्थानिक पदाधिकारी या निर्णय प्रक्रियेत सहभागी राहिले असते. तसेच त्यांनी नाराजी व्यक्त केली नसती. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे देखील म्हटले नसते. थोडक्यात खडसेंचा गेम हा शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपतील खडसे विरोधी गट करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे खडसेंची कन्या रोहिणीताई खडसे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात अडचणी वाढल्या आहेत.

Protected Content