केंद्रीय मंत्री रामविलास पासवान एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये दाखल

ram vilas pasavan

नवी दिल्ली प्रतिनिधी । केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना तात्काळ एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्यावर उपचार सुरू असून आज त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार आहे.

पासवान हे आज सकाळी नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्याच वेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले. रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी आहे. ७३ वर्षीय पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तर ते राज्यसभा सदस्य आहेत.

Protected Content