खडसे महाविद्यालयात सामूहिक राष्ट्रगान गायन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन उपस्थित होते. व्यासपीठावर एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक बावस्कर, डॉ.ताहीरा मिर, प्रा. विजय डांगे तसेच ग्रंथालय प्रमुख प्राध्यापक एन.जी.सरोदे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य महाजन यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम संपूर्ण राज्यात व देशभरात अतिशय उत्साहाने आणि जल्लोषाने संपन्न होत आहे. याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीय नागरिकाने बाळगला पाहिजे असे आवाहन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल पाटील आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे व प्रा.डॉ.प्रतिभा ढाके यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल यमनेरे तर राष्ट्रगीत गायन शितल भोई व सपना वंजारी यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन प्रा. विजय डांगे यांनी केले फोटोग्राफरचे कार्य तेजस सरोदे तर बैठक व्यवस्थेसाठी व कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी कुणाल भारंबे, शुभम गायकवाड, चेतन मोरे, व किरण माळी इत्यादी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Protected Content