जळगाव प्रतिनिधी । अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जनसंवाद व पत्रकारिता विभाग, मू.जे महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने के.सी.ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी 8 रोजी “श्रीमद भगवत गीता ध्वनिफीत प्रकाशन सोहळा”चे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याचे उदघाटक म्हणून प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे उपस्थित राहतील. या भगवत गीतेसाठी ज्योतिर्मयी संस्थेच्या संचालिका प्रा. रेखा रमेश मुजूमदार यांचा स्वर आहे.यावेळी उपस्थितीचे आवाहन के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे प्रतिष्ठानचे सचिव डॉं. ए. आर. राणे, उपाध्यक्ष किसन पाटील यांनी तसेच जनसंवाद व पत्रकारिता विभागातर्फे करण्यात आले आहे.