कर्मयोगी डॉ.विजय लेले यांचे निधन

dr. lele

पहूर, ता जामनेर प्रतिनिधी | आर.टी. लेले विद्यालयाचे सचिव व वैद्यकीय सेवेचे तीन पिढ्यांपासून व्रत अंगिकारलेले डॉ.विजय (अच्युत) महादेव लेले यांचे आज (दि.१०) आकस्मिक दु:खद निधन झाले.

पहूरसह परीसरात तीन पिढ्यांपासून लेले परीवार वैद्यकीय सेवा व सामाजिक बांधिलकेतून परिचित आहेत. त्याचप्रमाणे मोफत वैद्यकीय सेवा गरंजूना पुरविल्याने जिल्ह्यातही त्यांची हीच ओळख आहे. लेले विद्यालयाच्या माध्यमातून परीसरात शिक्षणाची गंगोत्री उदयास आली आहे. पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना व नातवंडे असा परीवार आहे. डॉ. भारती लेले यांचे पती तर डॉ. अनिकेत लेले यांचे ते वडील होते.

Protected Content