अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या खान्देशातील पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले नीम ता.अमळनेर जवळील कपिलेश्वर महादेव मंदिराचा उद्या बुधवार ता.२६ पासून महाशिवरात्री यात्रोत्सवास सुरुवात होईल.पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू असतो.
अमळनेर शहरापासून 25 किमी अंतरावर तसेच जळगाव व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेले एकहजार वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर हे खान्देशातच नव्हे तर भारतात अल्पवाधित सर्वत्र परिचयास आलेले ह्या मंदिरावर राज्यातील काना- कोपऱ्यातुन भाविकांची गर्दी होऊ लागल्याने परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे.मंदिराच्या दोन्ही बाजूला तापी , पांझरा आणि गुप्तगंगा असलेल्या त्रिवेणी संगमावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी ऋषी कपिल मुनींनी तपस्या करीत शिवलिंगाची स्थापना केली आहे.या मंदिराचे महत्व स्कंदपुराणातही सांगितले गेले आहेत.
याच ठिकाणी मंदिराचे मठाधिपती हंसांनंदजी महाराज यांनी सन २००५ साली अखिल भारतीय संत संमेलन भरविले होते. यावेळी समंध भारतातुन संतांनी हजेरी लावीत कळमसरेसह परिसरातील भूमी पावन झाली आहे.अध्यात्म आणि सामाजिकता यातून परिसरात कायापालट झाला असून मंदिराला लागूनच अनिरुद्ध बापूंचा आश्रम आहे.याठिकाणी दर शनिवारी व रविवारी मुंबई,पुणे ,नाशिकसह महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन भाविक येत असल्याने या निसर्गाच्या सानिध्यात भाविकांची मांदियाळी नजरेस पडत आहे. याच ठिकाणी मठाधिपती हंसांनंद महाराज यांनी लहान बालकांसाठी वेधशाळा सुरू केली असून शालेय शिक्षणाबरोबर त्यांना अध्यात्म ज्ञान दिले जात आहे.मंदिरावर वर्षभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात.तर महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरविला जातो.
मंदिरात तीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे.या जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक येत असतात. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले असून, संपूर्ण मंदिर हे हेमाडपंथी स्वरूपाचे आहे.मंदिराबाहेर नंदी विराजमान असून समोरच ऐतिहासिक अशी गगनचुंबी दिपमाळ आहे.दरम्यान यात्रोत्सवासाठी पाळणा,उपहारगृहे,संसार उपयोगी वस्तू, खेळण्याची दुकाने थाटली असून,परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातून थेट कपिलेश्वर महादेव मंदिरापर्यंत भाविकांसाठी एसटी बसेस ची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील व त्यांचे पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त राहणार असून मंदिरावर दाळ बट्टीचा नैवदय ,नवस फेडण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत.
श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराला तीर्थस्थळ व पर्यटनस्थळचा दर्जा मिळाला असल्याचा गाजावाजा आजही निःसंकोचपणे केला जातो खरा मात्र,मंदिराची जागा आजतागायत नावे नसल्याने शासनाच्या मिळणाऱ्या निधी पासून या तीर्थक्षेत्रास वंचित राहावे लागत आहे.परिणामी हंसानद महाराज व मंदिराचे विश्वस्त जळगाव धुळे जिल्ह्यात झोळी फिरवित बरीच विकासकामे केली आहेत.तर सद्यस्थितित लोकवर्गणीतुन प्रशस्त भक्त निवासाचे काम करण्यात आले आहे. शिवाय दरवर्षी तापी नदीला महापूर आला तर संपूर्ण मंदिराला पुराचा वेढा पडत असतो.म्हणून मंदिराचा चारही बाजूला संरक्षक भिंतीचे काम देखील मंदिर संस्थाने हाती घेतले आहे.
खान्देशातील प्रसिद्ध असलेले या मंदिराची महती सर्वदूर असल्याने दर्शनासाठी वर्षभर गर्दी होत असते.सुलवाडे बैरेजच्या बैक वॉटर मुळे मंदिराच्या तापी व पांझरा नदीत दोन्ही बाजूस पाणी असल्यामुळे यात्रोउत्सव दोन्ही काठावर भरविला जातो.दरम्यान खेळण्याची दुकाने,उपहार गृहे ,संसार उपयोगी वस्तु आदी दुकाने थाटली आहे.तर परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातून थेट कपिलेश्वर महादेव मंदिरापर्यंत भाविकांसाठी एसटी बसेस ची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.महाशिवरात्री निमित्त भाविकानी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे मठाधीपती हंसानद महाराज व मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे.