कंगना आता राखीच्या रडारवर

 

मुंबई- वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई शहराची तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर शिवसेना आणि कंगना असा नवा वाद सुरू झाला. त्यानंतर बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमध्ये बेकायदेशीर बांधकाम ठरवत ते उद्ध्वस्त केलं . यानंतर कंगनाने सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारवर बेछूट टीका करायला सुरुवात केली. आता ड्रामा क्वीन राखी सावंतनेही या वादात उडी घेतली आहे राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने कंगनाचा समाचार घेतला व उर्मिला मातोंडकर, जया बच्चन यांचं समर्थनही केलं आहे.

व्हिडिओमध्ये राखी सावंतने कंगनाविषयी अनेक आक्षेपार्ह शब्दही वापरले आहेत. या व्हिडिओमध्ये राखीने कंगनाला प्रश्न विचारत म्हटलं की, तिला मुंबई पीओकेसारखी वाटते तर ती इथे काम करण्यासाठी आलीच का? ‘आज जे कंगनाला पाठिंबा देत आहेत त्यांना लवकरच खरं काय ते कळेल. तिला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांना तिने सोडलं नाही. तर ती राजकीय पक्षाला तरी कश काय सोडेल. तिला पार्टीत घ्या तरी.. तिला तिकीटावर उभं करा तरी.. सगळ्यांची पोल खोलेल. कोणालाही सोडणार नाही.. फक्त तुम्ही पाहत रहा’

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना सतत सिनेसृष्टीवर टीका करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राखीने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच कौतुक केलं. घराणेशाहीवरून कंगना नेहमी करणवर टीका करते पण त्याच्यासारखा चांगला माणूस नाही , असं राखी सावंत म्हणतेय .

Protected Content