भाजप खासदारांना आज सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारकडून संसदेत अनेक विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. काही आणखी विधेयकं राज्यसभेत मंजूर करावी लगणार आहेत. भाजपने मंगळवारी आपल्या खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. खासदारांनी राज्यसभेत उपस्थित रहावं आणि सरकारच्या भूमिकेचं समर्थन करावं, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यसभेत आज एक महत्त्वपूर्ण विधेयक आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरून विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातला. विरोधी पक्षांच्या गदारोळात सरकारने कषी विषयक विधेयकं मंजूर करून घेतली. ही विधेयकं आधी लोकसभेत मंजूर करण्यात आली होती.

विदेशी योगदान नियमन कायद्यात सुधारणा करणारे विधेयक २०२०, साथीचे रोग सुधारणा विधेयक २०२० ही दोन विधेयक लोकसभेमधून मंजूर झाले. या व्यतिरिक्त, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक २०२० देखील लोकसभेनं मंजूर केलं. हे विधेयक राज्यसभेने यापूर्वीच मंजूर केलं आहे. यासह, केंद्रीय होमिओपॅथी (सुधारणा) विधेयक, २०२० आणि भारतीय वैद्यकीय केंद्रीय परिषद (सुधारणा) विधेयक, २०२० लोकसभेत मंजूर झाले.

Protected Content