कळमसरे ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगांना अनुदान वाटप

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामपंचायत कळमसरे यांच्या वतीने पाच टक्के दिव्यांगांच्या राखीव निधीतून सुमारे 31 लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या अनुदानाच्या धनादेशाचे वाटप सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी, मिराबाई बडगुजर, मीना कुंभार, लताबाई भिल, दिनकर चव्हाण, पल्लवी चौधरी, तसेच ग्रामविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे अनुदानाचे वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत कळमसरे यांच्या वतीने दर वर्षीच्या पाच टक्के दिव्यांगांच्या राखीव निधीतून दरवर्षी दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडून विविध भेटवस्तू अथवा रोखीने अनुदान वाटप केले जाते. त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे  जीवनमान उंचावण्यास ग्रामपंचायतीकडून हातभार लागत असतो. दिव्यांगाचे अनुदान वाटप केल्याने गावातील सर्व दिव्यांग बांधवांनी  ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करून समाधान व्यक्त केले. तरी यापुढे देखील  सदर लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान वाटप केले जाईल असे ग्रामविकास अधिकारी एस डी सोनवणे यांनी सांगितले.

यावेळी महमूदखा पठाण, सुमनबाई चौधरी, पायल शर्मा, निलेश राजपूत, भारती शर्मा, भिका कोळी, सतीश चौधरी, राजेंद्र चौधरी, रवींद्र महाजन, शीतल महाजन, सुरेश महाजन, दिलीप चौधरी, योगेश माळी, कुणाल पाटील, कैलास पाटील, अनिता चौधरी, सुनील बाविस्कर, कैलास चौधरी, कोकिळा चौधरी, वासुदेव चौधरी, सुदाम भिल, रणसिंग पवार, विनोद पवार, मंगला चौधरी, सुशील निकम, कालूसिंग पाटील, मिराबाई महाजन, विलास चौधरी, लोकेश कोळी, योगेश गुरव, दगा चौधरी आदी लाभार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपयांच्या धनादेशाचे अनुदानाचे वाटप करण्यात आले.

Protected Content