दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर विविध हिंदू संघटनाने काढलेल्या रथयात्रेत नागरिक लाठ्या, काठ्या आणि तलवार घेऊन सहभागी झाले.
बजरंग दलाकडून हि रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत सहभागी झालेल्या बऱ्याच लहान मुलांच्या हातातही तलवारी आणि काठ्या असल्याचं चित्र पाहायला मिळालं. यात सहभागी तरुणांना रथयात्रेत सामील झालेल्या तरुणांना तलवारी का ? असं विचारल्यावर ”लढाई झालीच तर आम्ही काय करणार, म्हणून आमच्या सुरक्षेसाठी आम्ही तलवार घेऊन आलो आहोत.” असं उत्तर त्यांनी दिलं.