नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवीराजे सिंधिया यांचे १५ मे रोजी सकाळी दिल्लीतील एम्समध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना न्यूमोनिया आणि सेप्सिसचा त्रास होता. तीन महिन्यापासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. माधवीराजे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात येणार आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवीराजे यांच्यावर गुरुवारी ग्वाल्हेरमध्ये अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात.माधवीराजे या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. समाजसेवेत त्या खूप सक्रिय होत्या. माधवीराजे या 24 चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या. हे ट्रस्ट शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या शिंदे गर्ल्स स्कूलच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षाही होत्या. माधवीराजे यांच्या निधनावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला.