जुने जळगावातील जुगार अड्ड्यावर छापा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

2017 03 18 Clubmatka ns

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुने जळगाव स्मशान भुमीच्या पाठीमागे खळवाडीतील इमारतीत पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने छापा टाकला. पथकाने छाप्यात त्यांच्याकडून कार, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा १० लाख ५० हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त केला असून संशयीतांना अटक करण्यात आली आहे.

शनिपेठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सचिन सुरेश साळूंखे (वय-30) यांच्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, नेरीनाका स्मशान भुमीच्या मागील बाजूस जुनेजळगाव परिसरात भास्कर काळे यांच्या मालकीच्या दुमजली ईमारतीतील गोदामात खंडू राणे (रा.जुने जळगाव)हा भाडोत्री बुकीद्वारे कल्याण मटका नावाचा सट्टा जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली होती, डॉ.रोहन यांच्या पथकातील उपनिरीक्षक मनोहर जाधव, सुनील पाटील, रविंद्र मोतिराया, अशोक फुसे, रविंद्र सपकाळे, रफीक पटेल, जुबेर तडवी, महेश पवार, नंदकिशोर धनके, गणेश नेटके, योगेश ठाकूर, मुकेश पाटील, यांच्या सह क्‍युआरटी फोर्सच्या पथकाने चारही दिशांनी घेराव टाकून छापा टाकला असता, खंडू राणे यांच्या खळवाडीतील दुमजली इमारतीच्या कंपाऊंड मध्ये बाहेर (एम.एच.19.बी.एन.7744) हि महिंद्र एक्‍युव्ही आढळून आली. पथकाने गोदामात प्रवेश करताच सट्ट्याच्या आकड्यांचा उतारा घेणऱ्या बुकींची धांदल उडाली. पोलिस पथकाने आहे, त्याच ठिकाणी खाली बसुन घेण्याच्या सुचना संबधीतांना दिल्यावर हेमंत भास्कर पवार (वय-44,रा.नशिराबाद), लोकेश विलासराव अत्तरदे(वय-29,रा.श्रीकृष्णनगर गोपाळपुरा), पवन सुरेश सोनार(वय-25,रा.राजाराम मंगल कार्यालय ), सुनील तुकाराम शिंदे वय-33,रा.नशिराबाद) अशा चौघांची अंगझडती घेतल्यावर रोकड सहित इतर साहित्य जप्त करण्यात आले. शनिपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी चौघांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन दाखल गुन्ह्यात जागा मालक व गोदाम मालकाचाही समावेश करण्यात आला आहे.

Protected Content