फैजपूर येथील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात “रायटिंग आणि रिसर्च  डेव्हलपमेंट मेथोडोलॉजी” या विषयावर १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान कार्यशाळा घेण्यात आली.

 

इंटरस्टेलर सायंटिफिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानाला उपस्थित व्याख्याते शुभम पाटील, प्रतिक जाधव इंटरस्टेलर सायंटिफिक कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तसेच विना लोमटे, सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज कॉम्प्युटर डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना खालील विषयावर मार्गदर्शन केले.

 

रिसर्च म्हणजे काय व तो विकसित कसा करावा? संशोधनाची गरज आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी त्याचे फायदे, एखादा प्रोजेक्ट कसा विकसित करावा तसेच रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय? आपले करिअर तसेच उच्च शिक्षणासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच भारत सरकार राबवित असलेल्या “इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अवेअरनेस” याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.

 

सदर कार्यशाळेचा लाभ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासह परिसरातील विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध इंजीनियरिंग महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी घेतला. या कार्यशाळेचे आयोजन प्रा. हितेश चौधरी व संगणक विभागाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. या कार्यशाळेसाठी कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा.डॉ. के. एस. भगत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन. डी. नारखेडे, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. पी. एम महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content