कोरपावलीच्या ग्रामसेवकाची सदस्यांना अरेरावीची भाषा

 

यावल (प्रतिनिधी ) तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाने  सदस्यांना उद्धट वागणूक दिल्याने  त्याची  तक्रार यावल पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पाठविण्यात आली आहे

 

कोविड १९ च्या संकटकाळात  ग्रामपंचायतिच्या कामकाजाची वेळ शासकीय नियमानुसार बदलामुळे ग्रामसेवक यांची पन्नास टक्के उपस्थिती असावी असे आदेश देण्यात आले होते, त्याचा गैरफायदा घेऊन  ग्रामसेवक  अनेकांना दिसेनासे झाले  होते  अनेकदा ग्रामस्थाना विविध अडचणींना सामोरे जावे लागले होते

 

ग्राम पंचायतमध्ये  अकरा सदस्य संख्या  असून  पुरेशी फर्निचरची व्यवस्था  नाही,  १४ वित्त आयोगातून  सबंधीत प्रस्ताव पारित करूनसुद्धा अद्याप सदस्यांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था नाही, अनेकवेळा सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात उभे राहावे लागते,अनेक वेळा सदस्यांनी फर्निचर खरेदीसाठी  तगादा लावला तरीही ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देत ग्रामपंचायत कार्यालयातुन निघून जातात

 

ग्रामसेवक सपकाळे यांनी काही सदस्याना उद्धट व अरेरावीची भाषा वापरून माझे कोणीच काही करू शकणार नाही , तुम्हाला माझ्या बद्दल कुणाकडे जायचे आहे , जा ,काय करायचं ते करा , अशा प्रकारची अशोभनीय वागणुक ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांच्याकडुन मिळत असते ग्रामसेवकांच्या कारभाराची वरिष्ठांनी तात्काळ चौकशी करून कोरपावली ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्याकडुन काढुन त्यांची बदली करण्यात यावी  अशी  तक्रार कोरपावलीचे  सरपंच विलास अडकमोल, सद्स्य आरिफ तडवी, सत्तार तडवी, सौ .हुरमत तडवी, सौ. अफशान तडवी, दीपक नेहेते, अफरोज पटेल यांच्या साहिनीशी गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांच्याकडे केली आहे त्यानंतर  तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्यामुळे  गटविकास अधिकारी या  ग्रामसेवकास पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

या संदर्भात तात्काळ गटविकास अधिकारी यांनी निर्णय न घेतल्यास सरपंच विलास अडकमोल आणी त्यांचे सर्व सहकारी हे जिल्हा परिषदचे सिईओ यांची भेट घेवुन त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे .

 

Protected Content