‘कर्तुत्ववान स्त्रियांचा सन्मान’ साई निर्मल फाउंडेशनचा उपक्रम

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | साई निर्मल फाउंडेशन भुसावळतर्फे शहरातील, विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांना भेट वस्तू व गुलाब पुष्प देऊन साई निर्मल फाऊंडेशनच्या वतीने त्या कार्यरत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. देश स्वतंत्र झाला पुरुषांसोबत स्त्रियांनाही स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. स्त्री-पुरुष विषमता मोडून काढण्यासाठी आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. सन्मानाचे पद भूषवित आहेत.

स्वतःच्या पायावर उभे राहून स्वकर्तुत्वाने जीवनातील अनेक संकटांना तोंड देऊन त्यावर मात करून यशस्वी जीवन जगणार्‍या आणि जागवणाऱ्या व त्यांच्या त्यांच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी व त्यातून एक नवचैतन्य व आदर्श विचारांची निर्मिती व्हावी व पुरुष आणि स्त्री विषमता कायमची दूर व्हावी यासाठी साई निर्मल फाउंडेशन भुसावळतर्फे भुसावळ शहरातील, महिला पत्रकार, गोरगरीब, कष्टकरी विधवा, परितक्त्या स्वकर्तुत्वावर उदरनिर्वाह चालवणाऱ्या, आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गोरगरीब स्त्रियांना भेट वस्तू व गुलाब पुष्प देऊन साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे यांनी त्या कार्यरत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील, देवेंद्र राजपूत, आर.के.कोळी, मोहन कासार, भागवत पाटील, कपिल पहूरकर मंडळी उपस्थित होती.

Protected Content