मुक्ताईनगरात नंबर दोनवाल्याची मुजोरी; पत्रकाराला धमकी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात नंबर दोन वाल्याची मुजोरी वाढली असून याच्या विरोधात वार्तांकन करणार्‍या पत्रकाराला धमकी देण्यात आल्याने फिर्याद दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर येथे ठिकठिकाणी खुलेआम सट्टा, जुगार अड्डा सुरू असून त्याबाबतची बातमी लावली असता सदर पत्रकाराला धमकावण्यात आले. पत्रकार अक्षय काठोके यांनी अवैध धंद्याची बातमी लावल्यानंतर गजानन मालगे याचा मावस भाऊ विजय पोलाखरे याने पत्रकार अक्षय काठोके यांना फोनवरून ”बातम्या का लावतोस ?” असे विचारत धमकावले. यावरून अक्षय काठोके यांनी गजानन मालगे यांना समजूतीसाठी फोन लावला असता की तुम्ही विजय पोलाखेरेला समजावून सांगा तो शिवीगाळ करत आहे. यानंतर, अक्षय काठोके याच्या घरी येऊन आई व बाबांना गजानन मालगे यांनी शिवीगाळ केली. यावरून मुक्ताईनगर पोलिसात गजानन श्रीकृष्ण मालगे व विजय देविदास पोलाखेरे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे

दरम्यान, सदर फिर्याद दाखल केल्यानंतर वैभव गलवाडे उर्फ गब्या ( राहणार फैजपूर हल्ली मुक्काम मुक्ताईनगर ) हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे आला व त्याने अक्षय काठोके याच्या हातातून मोबाईल हिसकावून ”फोनवर बोलणारा मी होतो ही फिर्याद मागे घे अन्यथा तुला मारून टाकेल” अशी धमकी पोलीस स्टेशन आवारात येऊन रात्री १२.३० वाजेला पोलिसासमोर दिली. तरी पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही.

मुक्ताईनगरात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू असतांनाही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. यातच नंबर दोनवाले पत्रकाराच्या घरी जाऊन धमकावत असतांनाही कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने याबाबत पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content