भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नेहमी गुन्हेगारी कृत्यांमुळे चर्चेत असणार्या भुसावळ शहरात काल रात्री पुन्हा एकदा डबल मर्डर झाल्याने परिसर हादरला आहे. तर याच घटनेत एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथील रहिवासी हेमंत कुमार भूषण या रेल्वे कर्मचार्यांने आपली आई आणि पत्नीचा खून केला आहे. हेमंत हा रेल्वे कर्मचारी असून अलीकडेच त्याचा विवाह झाला होता. आज पहाटे चारच्या सुमारास हे कृत्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून त्याने तव्याने मारहाण करत आई सुशीलादेवी ( वय वर्षे ६०) आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण ( वय २४) यांना मारून टाकले. याप्रसंगी त्याने त्याच्या घरी आलेल्या शालकावर देखील प्राणघातक हल्ला केला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. .घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड,सपोनि मंगेश गोंटला, हरिष भोये पोहचले असून चौकशीची चक्रे फिरवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हेमंत कुमार भूषण याला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.