जोशी पेठेतून तरूणाची दुचाकी लांबविली; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जोशीपेठेतील भोईगल्लीतून मासे विक्रेत्याची ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दुचाकीची चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, उमेश भिकन भोई (वय-३१) रा. भोई गल्ली, जोशीपेठ जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. उमेश राहत असलेल्या गल्लीत रस्त्यांची रूंदी कमी असल्याने जवळच असलेल्या हनुमान मंदीराजवळील रस्त्यावर दुचाकी पार्क करत असतात. मंगळवारी ३१ मे रोजी रात्री १० वाजता दुचाकी (एमएच १९ डीएस १७४९) ही हनुमान मंदीराजवळ पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास पार्कींगच्या ठिकाणाहून ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गुरूवार २ जून रोजी दुपारी उमेश भोई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!