जि. प. विषय क्रमांक २ सभापतींना अपात्र करा ; प्रा. डॉ. पाटील यांची तक्रार

notice to the jalgaon zp ceo 20180588764

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषद सभापती विषय क्रमांक दोनच्या निवड प्रक्रिया चुकीची झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या प्रा. डॉ. नीलम शशिकांत पाटील यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

जिल्हा परिषद जळगाव येथे ६ जानेवारी रोजी सभापती निवड विषय क्रमांक दोनसाठी भारतीय जनता पक्षाकडून उज्वला प्रशांत माळके व महाविकास आघाडीकडून प्रा. डॉ. नीलम शशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. नीलम पाटील यांच्या निदर्शनास आल्या यात निवडून आलेल्या उमेदवार उज्ज्वला प्रशांत मांळके यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रात नाव खोडून पुन्हा नवीन नाव लिहिलेले आढळले. त्याबाबत नामनिर्देशन पत्रासोबत खाडाखोड झाल्याबाबत प्रस्तावक यांची साधी स्वाक्षरी देखील नाही किंवा पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी त्यांच्यासमोर कोणतेही अभीसाक्षी प्रमाणपत्र संबंधित उमेदवार उज्ज्वला माळके यांनी सादर केलेले नाही. तसेच अत्यंत धक्कादायकबाब म्हणजे उज्ज्वला प्रशांत वाळके यांनी नामनिर्देशन पत्र भरताना प्रस्तावक हा निवडणूक नियमानुसार जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजपत्रात उल्लेखित असणे आवश्यक असतांना त्यांचे प्रस्तावक हे राजपत्रातील जि प सदस्य नाहीत. त्यामुळे विषय क्रमांक दोनसाठी उज्वला प्रशांत माळके यांचे ६ जानेवारी रोजी सभापतीपदासाठी सादर केलेले नामनिर्देशन पत्र अवैद्य आहे. तरी वरील बाबतीत विभागीय आयुक्त यांच्याकडे सुनावणी दरम्यान प्रा. नीलम पाटील यांनी संपूर्ण बाबी सुनावणी दरम्यान एड. चोकोर यांच्यामार्फत उपस्थित केलेले आहेत. ही निवडणूक सार्वत्रिक स्वरूपाची नसल्याने सभापती प्रक्रिया रद्द न करता फक्त विषय सभापती क्रमांक दोनसाठी विजयी घोषित केलेल्या उज्वला माळके यांना सभापतीपदासाठी अपात्र करावे व प्रतिस्पर्धी उमेदवार प्रा. डॉ. नीलम पाटील यांना विषय सभापती क्रमांक दोन साठी पात्र ठरून बिनविरोध सभापतीपदी निवडून आल्याचे घोषित करावे याबाबतची विनंती विभागीय आयुक्तांना केलेली आहे. तशी सुनावणी ११ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या समक्ष झालेली असून त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याबाबत मला न्यायाची अपेक्षा आहे असेच जि. प. सदस्य नीलम पाटील यांनी सांगितले.

Protected Content