जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या महानगराध्यक्षपदी जितेंद्र अरुण चांगरे यांची यांची नियुक्ती करण्यात आली.
जितेंद्र चांगरे यांना सामाजिक न्यायविभागाचे राज्य प्रमुख आ. अॅड. जयदेव गायकवाड यांनी पत्राद्वारे नियुक्ती केली आहे. त्यांना हे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या हस्ते जळगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा पक्ष कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी सरचिटणीस प्रदीप पाटील , विशाल देशमुख तसेच जयेश पाटील उपस्थित होते .