‘जिओ’चा नवीन फोन लवकरच बाजारात

jioll

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय बाजारपेठेत ‘जिओ’ लवकरच नवीन फोन दाखल करणार आहे. ‘जिओ’च्या या नव्या फोनमध्ये मीडिया टेक चिपसेट असणार आहे. रिलायन्स रिटेलच्या ४जी फोनची घटती मागणी लक्षात घेत कंपनीने नवा फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.

‘जिओच्या नव्या फोनच्या प्रोजेक्टवर सध्या काम सुरू आहे. लवकरच ग्राहकांना तो पाहता येईल याची आशा आहे. टेलिकॉम कंपन्यानी सांगत ते या फोनवर काम करत आहेत. KaiOS या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम सुरू आहे’, मीडिया टेकने(MediaTek) याआधी Lyf या ब्रँड अंतर्गत स्वस्त आणि मस्त अँड्रॉईड फोन बाजारात आणले होते. भारतात सध्या जिओ फोनसाठी कॉलकॉम आणि Unisoc कंपन्या चिपसेट उपलब्ध करून देतात. एप्रिल ते जून या तिमाहीत भारताच्या फिचर फोन बाजारपेठेत जिओ फोनच्या भागीदारीत घट होऊन २८ टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ४७ टक्के इतकं होतं. जिओ फोनच्या मागणीत सध्या घट होत असल्याचं निष्पन्न झाल्याने नव्या दमदार फोनसह बाजारात उतरण्याची तयारी जिओनं केली आहे. असं मीडिया टेकच्या वायरलेस कम्युनिकेशनच्या युनिटचे व्यवस्थापकीय संचालक टीएलली यांनी सांगितलं.

Protected Content