राष्ट्रीय शालेय धनुविदया स्पर्धेत जिज्ञासा भारंबे प्रथम

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ६७ वी  राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा दिनांक १३ ते १४ डिसेंबर 2023 दरम्यान नाडियाड, गुजरात येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेसाठी डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा ची विद्यार्थिनी जिज्ञासा प्रशांत भारंबे हिची प्रथमच महाराष्ट्र संघात निवड झाली होती.

मिळालेल्या संधीचे सोने करत या स्पर्धेत जिज्ञासा भारंबे हिने धनुर्विद्या रिकर्व प्रकारात उत्तम खेळ करत सांघिक द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले. राष्ट्रीय स्पर्धेतील तिच्या यशासाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक प्रफुल डांगे सर व महिला प्रशिक्षक स्वाती बाळापूरे मॅडम,  गोदावरी फौंडेशन चे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तसेच शाळेच्या प्राचार्या भारती महाजन, प्रशिक्षक अमर जाधव सर असलम सर, व वसीम सर  यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Protected Content