झाडांचे रोप व ट्री गार्डचे वाटप

 

jijau bahu ....11

अमळनेर प्रतिनिधी । जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने शहरामध्ये विविध शाळांना झाडांची रोप व ट्री गार्डचे वाटप करण्यात आले. ह्या वर्षी तापमानाचे वाढते प्रमाण व पाण्याची भीषण टंचाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले होते.

तसेच वृक्षांची झालेली मोठ्या प्रमाणात कत्तल हे देखील प्रमुख कारण आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी व राष्ट्रहित जोपासत जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जय योगेश्र्वर माध्यमिक विद्यालय, सरस्वती विद्या मंदिर, इंदिरा गांधी विद्या मंदिर, जी एस हायस्कूल, डि.आर. कन्या शाळा, पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कुल, लोकमान्य विद्यालय नवीन मराठी शाळा यांसह इतर सामाजिक संघटनांना झाडांची रोप व त्यांच्या संरक्षणासाठी ट्री गार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक पराग पाटील, प्राचार्य प्रकाश महाजन, प्रशासन अधिकारी अमोल माळी, डि.डी. पाटील, व ता. पाटील, प्रा. लिलाधर पाटील, प्रा.जे. जोशी, रनजीत शिंदे, संदिप पवार, के.डी. सोनवणे, देवरे, भुषण पाटील, हेमंत वाघ, नरेंद्र वारुळे, दत्तु पाटील, विजय धोत्रे, जितेंद्र पवार, मोहन चौधरी, रवींद्र कोळी, कुणाल पाटील आदि उपस्थित होते.

Add Comment

Protected Content