सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोलापूर जिल्हयात सांगोल्याजवळ भीषण अपघाताची घटना झाली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक राज्यातील एक जीपचा सांगालल्याजवळ अपघात झाला आहे. हा अपघात सांगोला-जत मार्गावर झाला आहे. हा अपघात जीपचा टायर फुटल्याने झाल्याची माहिती मिळाली आहे. या जीपमधील तीन मजूर महिला जागीचा ठार झाल्या असून नऊ महिला गंभीर जखमी झाल्या आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या महिला कर्नाटकातील अथणी येथील रहिवासी असून पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांमध्ये कामासाठी जात होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या अपघाताची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात करण्यात आली. अपघातातील मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
सांगोल्याजवळ टायर फुटल्याने जीपचा अपघात; ३ महिला ठार, ९ जखमी
10 months ago
No Comments