जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे सौ. जयश्री पाटील या उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने ही निवड चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची जिल्ह्यातील पहिली बैठक सायंकाळी अजिंठा विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगर युवक अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होेते. या वेळी अध्यक्षपदासाठी सौ. जयश्री पाटील यांचे नाव निश्चीत करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपचे काही सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. काँग्रेसने जयश्री पाटील यांच्या नावाला पाठींबा दिला असून त्यांच्या चारही सदस्यांना व्हिप बजावला आहे.