शहरात 73 तळीरामांवर कारवाई; प्रत्येकी दोन हजाराचा दंड वसूल

Drunkdriving

जळगाव प्रतिनिधी । थर्टी फर्स्टचा जल्लोष करताना मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्‍या ७३ तळीरामांवर मध्यरात्री कारवाई केली. प्रत्येकी 2 हजार या प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय मद्यविक्री, हद्दपार आदेशाचे उल्लंघन व इतर प्रकरणात ५५ गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध मद्यविक्री करणाऱ्‍यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून २ लाख ४८ हजार ४९७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पहाटे पाच वाजेपर्यत मद्यविक्रीचे दुकान सुरु ठेवण्याची परवानगी शासनाने दिली होती. या आनंदावर विरजन पडू नये, अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस दलातर्फे रात्री ११ ते पहाटे तीन या वेळेत जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह २२ दुय्यम अधिकारी व २४० कर्मचारी रस्त्यावर होते.

जळगाव शहरात महामार्ग, काव्य रत्नावली चौक यासह प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. २३२ वाहनांची तपासणी करण्यात आली असता त्यात २८ जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाईची कारवाई करण्यात आली. जिल्हाभरात १ हजार २७५ वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील ३६ पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री मोहीम राबविण्यात आली. त्यात सराईत गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, हद्दपार आरोपी, फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या घरांची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय ११२ ढाबे,१९ लॉजेसची तपासणी करण्यात आली.जिल्ह्यातील रेल्वे स्थानक व बस स्थानकांची २४ ठिकाणी तपासणी करण्यात आली.

Protected Content