राज्य परिवहन महामंडळाकडून आचारसंहितेचे उल्लंघन; यावलला राष्ट्रवादीची तक्रार ( व्हिडीओ )

Yawal 1 1

यावल (प्रतिनिधी)। महाराष्ट्र एस.टी. परिवाहन महामंडळाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदर्श आचार सहींता भंगची महाराष्ट्र राज्यातील पहिलीच तक्रार प्रा. मुकेश घेवले यांनी यावल येथे नायब तहसीलदार आर.के. पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी जिल्हा निवडणुक आधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा मुख्य निवडणुक आयोगाने जाहीर केली असुन, निवडणुक जाहीर होताच राज्यासह संपुर्ण देशात १० मार्चपासुन सायंकाळी ५ वाजेपासुन आदर्श आचारसंहितेचा महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण देशात लागु करण्यात आली आहे. असे असतांना राज्यातील एस.टी. पारिवाहन मंडळाच्या बसेसवर आणी सार्वजनिक ठिकाणी पेट्रोल पंपांवार राजकीय नेत्यांचे चित्र असलेले व शासकीय योजनांची माहीती देणारे फलक होर्डींग पोस्टर हे आचारसंहिता लागण्यास २४ तासांपेक्षा अधिक वेळ संपला तरी ही पोस्टर एसटी महामंडळाने अद्याप का काढली नाही, अशी तक्रार करून हे आचार संहितेचा भंग नाही का असे म्हटले असुन, निवडणुक आयोगाने तात्काळ संबधीत विभागस राज्यातील सर्व एस टी बसेस व पेट्रॉल या सार्वजनिक ठीकाणी झडकत असलेली पोस्टरर्स हाेड्रींग काढण्याचे आदेश देवुन आदर्श श्राचार आचारसहींतेचे पालन करावे असे म्हटले आहे. यावेळी प्रा. मुकेश येवले, देवकांत पाटील, निवृत्ती धांडे, वसंत गजमल पाटील अॅड. निवृती पाटील, करीम मणीयार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

पहा । राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

Add Comment

Protected Content