मृतावस्थेत आढळलेल्या ‘त्या’ बिबट्यावर अंत्यसंस्कार ( व्हिडीओ )

0

WhatsApp Image 2019 03 12 at 2.21.33 PM

चाळीसगाव (प्रतिनिधी)। तालुक्यातील रोकडे शिवारातील सुपडू देवराम पाटील यांचे शेताचे बांधावर झाडीमध्ये 11 मार्च रोजी दुपारी 4 वाजता बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती येथील उपसरपंच सुनिल पवार यांनी वनविभागाचे वनक्षेत्रपाल संजय मोरे यांना दिल्याने त्यांनी आपल्या सहकारी पथकाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळावर पाठवून पाहणी केली रात्री एका पथकाने बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा परिसरात प्रयत्न केला. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास या बिबट्याची डॉ.एम.बी. गंदीगुडे, डॉ.दिप्ती कछवा, डॉ.संदीप भट यांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी करून शवविच्छेदन केल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
सदर बिबट्या विषबाधा झाल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज या वैद्यकीय पथकाने व्यक्त केला आहे. यावेळी उपवनसंरक्षक दिगंबर पगार, राज्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनक्षेत्रपाल संजय मोरे, वनक्षेत्रपाल गस्तीपथक धनंजय पवार जळगाव, वनरक्षक गस्तीपथक जळगाव गणेश गवळी, वनपाल घोडेगाव प्रकाश देवरे उपखेड वनरक्षक अजय महिरे, जुनापाणी वनरक्षक प्रवीण गवारे घोडेगाव वनरक्षक संजय चव्हाण, वनरक्षक संजय जाधव, तसेच वनमजूर श्रीराम राजपूत, बाळू शितोळे, भटू पाटील, राहुल मांडोळे, संतोष सोनवणे वनमजूर सरपंच सुनील पवार, माजी सरपंच संदीप पाटील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!