राज्यस्तरीय क्रॉसकंट्री क्रीडा स्पर्धेत जयेशला कांस्य पद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चंद्रपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री क्रीडा स्पर्धेत ६ किलो मिटर धावणे गटात यावल तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक विद्यालयाचा विद्यार्थी जयेश विलास पाटील याला कांस्य पदक मिळविले आहे.

गेल्या आठवड्यात नाशिक येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात जयेश विलास पाटील याने प्रथम क्रमांक ही पटकावला होता. तसेच ३ किलो मिटर धावणे या स्पर्धेतही तृतीय क्रमांक पटकावला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या जयेशने  विभागीय क्षेत्रामध्ये प्रथम, राज्यस्तरीय क्रिडामध्ये कांस्य पदक व आता त्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे, संस्थेचे संचालक परमानंद साठे, चिंचोली येथील स्कूल कमिटीचे चेअरमन अनिल साठे,प्राचार्य के एस पाटील, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या जयेशने विभागीय स्पर्धेत हे यश संपादन केले बदल त्याचं जिल्हासह तालुक्यातून व चिंचोली परीसरातुन विशेष कौत्तुक व अभिनंदन होत आहे.

Protected Content