आरक्षण आंदोलनामुळे बसफेऱ्या रद्द झाल्याने यावल आगाराचे लाखोंचे नुकसान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मागणीसाठीच्या आंदोलनामुळे यावल एसटी आगारातुन ५ दिवसात अनेक लांब पल्याच्या बसफेऱ्या रद्द झाल्याने आगारास ६ लाखाचे नुकसान झाल्याची माहीती एसटी महामंडळाच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या अंतरावली सराटी गावात आठ दिवस चाललेल्या आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी समाजाने आक्रमक रूप धारण केल्याने राज्यात आंदोलन कर्त्यांनी बसगाड्यांना लक्ष केले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने राज्यातील अनेक बसेस रद्द करण्याचा निर्णय घेतला,यामुळे यावल एसटी आगारातुन आंदोलनाच्या कार्यकाळात आगारातुन सुटणाऱ्या लातुर,पुणे,छ्त्रपती संभाजी नगर, माहुरगढ, वढोदरा, सुरत (गुजरात), धुळे, शिर्डी आदी ठिकाणच्या सुमारे पन्नास फेऱ्या रद्द करण्यात आल्याकारणाने यावल आगारास उत्पन्नात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दिली.

Protected Content