यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील हिन्दू मुस्लीम बांधवांनी बंधुभाव व शांततेची परंपरा कायम राखुन येणार्या काळातील सण सर्व धर्मातील समाज बांधवांनी एकत्रीत येवुन शांततेच्या मार्गाने साजरे करावे असे आवाहन यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांनी येथे रविवार रोजी साजरे होणार्या मुस्लीम बांधवांच्या प्रसिद्ध असलेल्या जश्ने पैरहनच्या मिरवणुकी संदर्भात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत नागरीकांना केले.
यावल येथील पोलीस ठाण्याच्या आवारात यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २१ जुलै रविवार रोजी साजरे होणार्या मुस्लीम बांधवांच्या जश्ने ए पैरहन शरीफच्या मिरवणुक ही शहराच्या मागील वर्षाच्या परंपरेनुसार सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी व्हावी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत करून कुणी कायदा हातात घेण्याचे प्रयत्न करू नये व कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होवु नये या विषयांवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. समितीच्या वरिष्ठ सदस्यांशी व पैरहन कमेटीच्या प्रमुखांशी चर्चा व्हावी या दृष्टीकोणातुन पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बैठकीत शंभर वर्षाची परंपरा असलेल्या मुस्लीम बांधवांचे जश्ने पैरहन शरीफची या वर्षी काढण्यात येणारी ढोली जुलुस ( मिरवणुक ) ही कोणत्याही वाद्य शिवाय निघणार असल्याचे यावेळी पैरहन कमेटीच्या वतीने जाहीर करण्यात आले डांगपुरा पैरहन कमेटीने घेतलेल्या निर्णयाचे बैठकीत स्वागत करण्यात आले.
या बैठकीला शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान,प्रा.मुकेश येवले , विजय सराफ,गोपाळसिंग पाटील, माजी नगरसेवक सय्यद युनुस सय्यद युसुफ, भगतसिंग पाटील,हाजी ईकबाल खान,डॉ.निलेश गडे,हाजी गफ्फार शाह, नितिन सोनार ,डांगपुरा मोहल्ला पैरहन कमेटीचे अध्यक्ष शेख फारूख मुन्शी ,कुश्ती दंगलीचे अध्यक्ष उमरअली कच्छी यांच्यासह शेख हकीम शेख याकुब , हाजी गुलाम रसुल मेंबर ,अमोल भिरूड, विवेक दगडू सोनार, यावल नगर परिषदचे कार्यालय अधिक्षक राजेश गावंडे , रहेमान खाटीक ,नईम शेख यांच्यासह आदी शहरवासी नागरीक उपस्थित होते.