फैजपुरात प्रफुल्ल लोढा यांचा फोटो जाळला (व्हिडिओ )

 

फैजपूर, प्रतिनिधी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर प्रफुल्ल लोढा यांनी खोटेनाटे आरोप केल्याने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस व माजी आमदार मनिष दादा जैन फाउंडेशनच्या वतीने लोढा यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना केद्राने ईडीची नोटीस बाजवली असून याचा निषेध करण्यात आला. यासोबत प्रफुल्ल लोढा यांचा सुभाष चौकात पुतळा जाळण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पिके चौधरी, माजी उपनगराध्यक्ष जलिल हाजी सत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, पीआरपी जिल्हाध्यक्ष आरीफ शेख, डॉ. निलेश हरी आमोदकर, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ, माजी नगरसेवक संजय रल, शहर उपाध्यक्ष सरफराज तडवी, युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष साजिद शेख, नौमानी फाउंडेशन अध्यक्ष रमजान शरीफ, अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष अलताफ सर, रावेरचे गयास काजी, अस्लम शेख शहर संघटक सद्दाम मन्यार, सेवादल शहराध्यक्ष आरीफ तडवी, आदीवासी शहराध्यक्ष मोहसीन तडवी, टीपु तडवी, ईच्छु शेख, सागर सोनवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/215950696751334

Protected Content