यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाला आरक्षणा संदर्भात अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणास यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आंतरवाली सराटी येथे जात पाठिंबा दर्शविणारा ठराव मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला आहे.
मागील १६ दिवसापासून अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहे या उपोषणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. यावल तालुका सकल मराठा समाजाचे वतीने यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, डी बी पाटील वसंत गजमल पाटील, ललित विठ्ठल पाटील, सुनील दशरथ गावडे व यावल तालुक्यातील समाज बांधव यांनी अंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांना तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने समाजाच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविणारा ठराव देण्यात आला आहे.
याप्रसंगी यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळण्यासंदर्भात वेळोवेळी केलेले आंदोलने तसेच पाच सप्टेंबर रोजी या उपोषणास पाठिंबा दर्शवणारी व मराठा,समाजास आरक्षण त्वरित द्यावे यासाठी शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी तालुक्याचे वतीने ठराव स्वीकारत समाज बांधवांचे आभार व्यक्त करीत समाधान मानले.