जनसंवाद यात्रा : रोहिणी खडसे यांनी आदिवासी पड्यांवर साधला संवाद*

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तेविसाव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील हलखेडा,लालगोटा, जोंधनखेडा, राजुरा ,उमरा, हिवरा येथील ग्रामस्थांसमवेत संवाद साधला.

 

बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,यात्रा प्रमुख जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,  तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर, माजी सभापती दशरथ कांडेलकर,डॉ बि सी महाजन, तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे, रामभाऊजी पाटील,प्रदिप साळुंखे, अतुल पाटील, विकास पाटील,पवन डी पाटील, गजानन पाटील,प्रविण कांडेलकर,संतोष कांडेलकर,बुलेष्ट्रीन भोसले,मधुकर गोसावी, रवींद्र पाटील,  मयुर साठे, भैय्या कांडेलकर, आशिष हिरोळे,सुशिल भुते, विशाल रोटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.  यावेळी  हलखेडा येथील आदिवासी समाजातील शफी भोसले म्हणाले,  सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आमच्या आदिवासी समाजाला नाथाभाऊ यांनी ओळख दिली  समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले

आमच्या आदिवासी पाड्यापर्यंत शासकीय योजना आणून आम्हाला योजनांचा लाभ मिळवून दिला. पाड्यापर्यंत डांबरी सडक व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. नाथाभाऊ हे आमच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी होऊन आम्हाला कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे भासतातआम्ही कायम नाथाभाऊ यांच्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली

रोहिणी खडसे यांनी आदिवासी पाड्यावर मनोगत व्यक्त करताना सांगितले गेले तिस वर्षांपासून तुम्ही सर्व आदिवासी समाज बांधव नाथाभाऊ यांच्या पाठीशी आहात.नाथाभाऊ यांनी सातपुड्याच्या कुशीतील प्रत्येक वाड्या वस्त्यांना डांबरी रस्त्यांनी जोडले शिक्षण, आरोग्य, विज पाणी समाज मंदिरे इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या

हा विकासाचा रथ असाच सुरू ठेवण्यासाठी तुमची साथ कायम  अशीच आमच्या सोबत राहू द्याव जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद व्हा असे त्यांनी आवाहन केले

यावेळी  हलखेडा येथील बुलेष्ट्रीन भोसले, शफी भोसले, ठगडी मामा, जकीनंदर भोसले, रमेश भोसले, संगीलाल पवार, रवा मटण पवार, सरविस दिलबर पवार, साहेबराव करवे,नरसुंगी पवार,मधुबाना पवार, खमाबाई भोसले,खमीस भोसले, सरफिंदर पवार, शटा बादशहा भोसले, मंदाकिनी भोसले

 

 

 

 

 

 

 

Protected Content