भारतीय युवा लोकशाही जनक्रांती मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी उपोषण

jankranti morcha news

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज भारतीय युवा लोकशाही जनक्रांती मोर्चाच्या वतीने प्रा.डॉ. आशिष जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

या आहेत मागण्या
यावर्षी अती पावसामुळे जळगांव जिल्हयातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हंगामी निके पुर्णतः नष्ट झालेली आहे. शेतकरी पिक कर्ज, बॅक कर्जांनी पुर्णपणे ग्रस्त आहे. हाताचे आलेले संपूर्ण पिकांचे नुकसानीमुळे बहुसंख्य शेतकरी आर्थीक विवंचनेमुळे वैफल्यग्रस्त होवून आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे. मोठया प्रमाणात आत्महत्या शेतकरी वर्ग करीत आहे. करीता जळगांव जिल्हा हा या वर्षात ओला दुष्काळ जाहीर करून केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे त्वरीत या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून आर्थीक मदत देण्यात यावी.

जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दैनीय झालेली असून रस्त्याने पायी चालण्यासाठी सुध्दा रस्त्यावर जागा मिळत नाही. इतके खडडे रस्त्यावर झाले आहे. परिणामी रोजचे अपघात सामान्य नागरीकांना दखापती आणि अपघाती मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात फार मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. करीता रस्त्यांची पुर्ननिर्मिती करण्यात यावी.

जळगाव शहराच्या सुरक्षतेबाबत प्रामुख्याने भर रहिवासी वत्यांमध्ये सुरु असलेले मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण करणारे आणि मानवी जिवीतास कारखान्यास आग लागण्याच्या शक्यतेतून धोका निर्माण होत असलेल्या कारखान्यांवर बंदी घालुन ही कारखाने मानव विरहीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे. जसे की सुरत रेल्वे लाईन लगत शिवाजी नगर रस्त्याला लागुन असणारी एस.के. आईल मिल, भर वस्तीत आहे. शहरातील सुप्रिम कॉलनीला लागुन असणाऱ्या रासायनीक द्रव्य निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि अशा प्रकारे शहरात भर वस्तीत असणाऱ्या कंपन्या, कारखाने सदरच्या या धोकादायक कंपन्यांवर आपण व्यक्तीशः जिल्हाधिकारी म्हणून या निवेदनात दर्शविल्याप्रमाणे कुठलीही कार्यवाही आपण केली नाही व पुढे भविष्यात सदरचे कारखाने व कंपन्यामुळे तेथिल वस्तीत जिवीतहाणी झाल्याचा प्रसंग उद्भवल्यास सदरच्या घटनेसाठी आपण व्यक्तीशः जिल्हाधिकारी म्हणून कुठलिही प्रतिबंधात्मक उपाय योजना केली नाही म्हणून सर्व स्थरावर आपणांस व्यक्तीशः या निवेदनाद्वारे जबाबदार ठरविण्यात येईल, याची आपण कृपया विशेष नोंद घ्यावी.

जळगाव शहरामध्ये साथीच्या रोगांचा मोठया प्रमाणात फैलाव होत असल्यामुळे शहर परीसर स्वच्छ करुन रोगप्रतिबंधक उपाय योजना त्वरीत करण्यात याव्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोग प्रतिबंधनात्मक औषधीचा साठा तयार करुन सर्व सामान्यांना सदरच्या औषधोउपचार सहज उपलब्ध व्हावेत. तसेच घाण , कचरा साठवण व दुर्गधीमुळे मोठया प्रमाणात मानवाला बाधा पोहचविणारे विषाणु, किटाणु व मच्छर यांची मोठया प्रमाणात शहरात निर्मीती होत असल्याकारणामुळे जळगांव शहर लवकरात लवकत कचराकुडी मुक्त करुन स्वच्छ सुदंर आणि सुरक्षित करावे त्याचबरोबर महानगरपालिकेत साफसफाई कर्मचाऱ्यांची मान्यता मंजुरी मिळालेली ५३७ रिक्त जागा साफसफाईच्या कामांना गती यावी म्हणून त्वरीत भरण्यात यावी.

यांची होती उपस्थिती
प्रमुख उपोषणकर्ते प्रा.डॉ. आशिष एस. जाधव आणि ईश्वर डी. मोरे, अनिल नाटेकर, राजेंद्र पाटील, राजेंद्र बडगुजर, अशफाक पिंजारी, शाहिद खाटीक, दिनकर पवार, राजेश सोनवणे, भैय्यासाहेब निकम, अमोल कोल्हे आदींनी उपोषणात सहभाग घेतला.

Protected Content