छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोमवारी होऊ घातलेल्या शिवजन्मोत्सवासाठी शहरातील रस्त्यांवर भगव्या झेंड्यांची विक्री सुरू झाली आहे. यंदा जाणता राजा, अश्वारूढ आणि उभी प्रतिमा या डिझाइन्सच्या झेंड्यांना सर्वाधिक मागणी आहे. शहरात सुमारे २ लाख झेंडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, श्रीराम मंदिर उत्सवासाठी झेंड्यांची मोठी मागणी पूर्ण केली. त्यामुळे शिवजयंतीसाठी झेंडे तयार करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम झाल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.यंदा झेंड्यांची निर्मिती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे ‘जाणता राजा’ ,‘छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा फोटो’ आणि ‘अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज’ अशा तीन झेंड्यांची निर्मिती केली आहे.
‘जाणता राजा’ झेंडयाची सर्वाधिक मागणी; २ लाख झेंडे विक्रीसाठी उपलब्ध
10 months ago
No Comments