Home Cities जामनेर जामनेर तालुका भाजपाच्या वतीने लष्करप्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली

जामनेर तालुका भाजपाच्या वतीने लष्करप्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली

0
85


जामनेर प्रतिनिधी | तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराच्या हेलिकॅप्टरचा अपघात होऊन लष्करप्रमुख बिपिन रावत, त्यांच्या पत्नी व शहीद झालेल्या ११ जवानांना भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपरिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकात कुन्नूर येथील हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या लष्कर प्रमुख बिपिन रावत व त्यांच्या पत्नी सह ११ जवानांना जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांनी अपघातात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

याप्रसंगी जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन संस्था सचिव जितेंद्र पाटील उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, अतिश झाल्टे, उल्हास पाटील, सुभाष सुरवाडे, सुहास पाटील, ज्येष्ठ नेते श्रीराम महाजन, दीपक तायडे, संतोष बारी, कैलास पालवे, सुभाष पवार, नितीन झाल्टे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी, नागरिक तसेच आजी माजी सैनिक या सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली


Protected Content

Play sound