जामनेर शहरात भाजपाने काढली तिरंगा रॅली

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.

जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता भाजपा शहरच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला बाबाजीराव मंगल कार्यालयात भारत मातेच्या प्रतिमेची पुजन करण्यात येवून रॅलीला सुरूवात करण्यात आली. ही रॅली जामनेर शहरातील नगरपालिका चौक, वाकी रोड, जळगाव रोड, भुसावळ रोड, जामनेर पुरा, शास्त्रीनगर गांधी चौकमार्गे आमदार कार्यालय जवळ तिरंगा रॅलीचे समारोप करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप कोळपे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नवल पाटील, जि.प. सदस्य अमित देशमुख, विलास पाटील, आनंदा लावरे, कमलाकर पाटील, रवींद्र झाल्टे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषेदचे सदस्य, शेतकरी संघ सदस्य, नगरसेवक व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content