शेतकरी पुत्र तहसीलदारांनी केली शेतात कोळपणी

शेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कालखेडा रोडवरील शेतात शेतकरी पुत्र शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी शेतात स्वत: बैलजोडीचा कासरा हातात घेवून कोळपणी फिरविली.

तालुक्याचा राजा म्हणून तशिलदार यांच्याकडे पाहायला जाते वास्तविक पाहता शासकीय अधिकाऱ्यांना रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. परंतु शेगाव तहसीलला शेतकरी पुत्र लाभलेले तहसीलदार समाधान सोनवणे यांना शेतीकामाचा मोह आवरता आला नाही व त्यांनी कालखेड रोडने जाताना रवींद्र देशमुख यांच्या शेतात सोयाबीनची कामगिरी सुरू असताना तहसीलदार यांनी आपले वाहन थांबून स्वतः डवऱ्याचा फेर मारला. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला शेगाव तशिलदार यांना शेती, शेतकरी यांच्या बद्दल खूप आस्था असल्याचे समजते. यामुळे शेगाव तालुक्यातील जनतेचे कामे लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा तशिलदार यांच्याकडून जनता करीत आहे.

याआधी सुद्धा तहसीलदार सोनवणे यांनी पावसाळा सुरू होताच पहिले पाणी आल्यानंतर पूर्णा नदीवर जाऊन पूजा सुद्धा केली होती.

Protected Content