जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि युवासेना शाखांचे उदघाटन करण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील वाकोद,हिवरखेडा तवा वाडी आणि लोणी येथे शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि युवासेना शाखांचे उदघाटन करण्यात आले. या सर्व ठिकाणी डॉ. पाटील यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर शाखा उदघाटन आणि फलक अनावरण करण्यात आले.
यावेळी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख गणेश पांढरे,माजी उपजिल्हा युवा अधिकारी भरत पवार, तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे, तालुका युवा कार्यकारिणी सदस्य मयुर पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोक जाधव,कृष्णा चोरमारे, उपतालुका युवा अधिकारी रोहन राठोड, शेतकरी सेना तालुका संघटक भाऊराव गोंधनखेडे, विभागप्रमुख मोहन जोशी,पं.स.गण प्रमुख नागेश्वर पाटील, उपतालुका युवा प्रसिध्दी प्रमुख राहुल पाटील, आशिष मोहिते,माजी शिवसेना पहुर शहर प्रमुख सुकलाल बारी,युवानेते वाकडी ग्रा.पं.सदस्य प्रविण गायकवाड,राहुल वंजारी,विनोद जोशी, वासुदेव जोशी, पवन जोशी,अल्पसंख्यांक आघाडीचे सईद शेख यांच्यासह वाकोद,हिवरखेडा,लोणी गावचे नवनियुक्त शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक-युवासैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.