ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर !; अनिल परब यांचा गौप्यस्फोट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । कट्टर शिवसैनिक असलेले रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतू काही त्रृटी काढून राजीनाम नामंजूर करण्यात आला. दरम्यान ऋतूजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात येत आहे असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे. राजीनामा नामंजूर करण्यासाठी आयुक्तांवर राज्य सरकार दबाव टाकत असल्याचा आरोपीही यावेळी परब यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ऋतुजा रमेश लटके यांनी नियमाने राजीनामा दिला होता. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. महापालिकेची कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. तरीही त्यांचा राजीनामा नामंजूर केला. यासंदर्भात आयुक्तांची भेट घेवूनही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. राज्य सरकार मुंबई महापालिकेचे आयुक्त यांच्यावर दबाव टाकत असल्याचे देखील परब यांनी सांगितले.

शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना अनेक अमिषे दाखवण्यात येत आहेत. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. पण ऋतुजा लटके या कट्टर शिवसैनिक आहेत. त्या कुठेही जाणार नाहीत. त्या शिवसेनेतच राहतील. त्यांचा राजीनामा मंजूर झाला तर त्या शिवसेनेकडूनच लढतील, असेही त्यांनी सांगितले.

Protected Content