जामनेर नगरपरिषदतर्फे दिव्यांग बांधवांना निधी वाटप 

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जामनेर नगरपरिषदतर्फे शहरातील १५ दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आला.

दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या नगरपालिकेच्या पाच टक्के निधी जामनेर शहरातील 15 दिव्यांगांना पाच टक्के निधीचा धनादेश मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आला असून एकूण 300 दिव्यांगाना निधी उपलब्ध नुसार टप्प्याने धनादेश वाटप होणार असल्याची माहिती नगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. दि. ६ रोजी जामनेर येथील दत्ताचैतन्य नगर मधील नगरपरिषद सभागृहात जामनेर नगरपरिषदेने दिव्यांग बांधवांना निधी वाटप केली.

सदर वेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील उपनगराध्यक्ष शरद पाटील, गटनेते डॉ प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील, नगरसेवक अतिष झाल्टे, अनिस शेख, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील, रतन गायकवाड, भगवान सोनवणे, रवींद्र भोई, शेख शरीफ पिंजारी, सुहास पाटील दिव्यांगांचे प्रतिनिधी रवी झाल्टे पवन माळी व इतर नगरसेवक तसेच नगरपरिषद अधिकारी दुर्गेश सोनवणे व कर्मचारी उपस्थित होते, सूत्रसंचालन आत्माराम शिवदे यांनी केलं. तसेच यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटील यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केलं

Protected Content