जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव आणि कासली येथे आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांसाठी आ. गिरीशभाऊ महाजन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, जामनेर तालुक्यात आज सकाळी तळेगाव आणि कासली येथे घरांना आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. यात कासली येथील बानूबाई दिलवर तडवी यांच्या घराला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याने सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्यात. तर तळेगाव येथील सुभाष मिस्तरी, गजानन माळी आणि अर्जुन कोळी यांच्या घरालाही आगी लागल्या. यात सुभाष मिस्तरी यांच्या घरातील वस्तू जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी जामनेर तालुक्यात ग्रामीण भागात दौर्यावर असलेले आमदार गिरीश महाजन यांना घटना घडल्यानंतर अनुक्रमे ते तळेगाव या ठिकाणी गेले. त्यांनी कसली येथे महिलेचा संपूर्ण घर आगीत जळालेल पाहून त्यांनी तात्काळ त्या महिलेला दहा हजार रुपयांचा स्वतःच्या खिशातून मदत केली. तर दोन्ही ठिकाणच्या आगींचा पंचनामा करून तात्काळ मदत करण्याच्या देखील सूचना केल्यात.