जामनेर येथे पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळीचा ग्राहकाचा आरोप

WhatsApp Image 2019 06 28 at 1.50.13 PM

जामनेर (प्रतिनिधी) : येथील भुसावळ रोड वरील मार्तण्ड विजय पेट्रोल पंपमधून प्रदीप रामदास कल्याणकर यांनी त्यांच्या गाडीत पेट्रोल भरले मात्र त्यांची गाडी पुढे जाऊन बंद पडल्याने पेट्रोलमध्ये भेसळ झाल्याचा आरोप करून पेट्रोल पंपचालकावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

भुसावळ रोड वरील मार्तण्ड विजय पेट्रोल पंप वर तक्रारदार प्रदीप रामदास कल्याणकर यांनी MH 19 DF 2095 या गाडीत सकाळी नऊ चाळीस वाजता पेट्रोल टाकले. यानंतर त्यांची गाडी १ कि. मी. अंतर पुढे गेली असता ती बंद पडली. त्यानंतर त्यांनी गाडी मेकॅनिकला दाखवली असता त्याने पेट्रोलमध्ये पाणी असल्याने गाडी बंद पडल्याचे सांगितले. हीबाब सजल्यावर तक्रारदार पेट्रोल पंप मालकाकडे गेला असता त्यांनी अरेरावी करून शिवीगाळ केली व तुझ्याकडून जे होईल ते कर मी कुणाला घाबरत नाही असे उलटउत्तर दिल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. या पेट्रोल पंप विरूध्द या पूर्वीही अनेक तक्रारी केल्या आहेत. यापंपाचा मालक राजकीय पक्षांशी संबंधित आहे. तहसिलदार, पुरवठा निरीक्षक यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र काही एक कारवाई केली जात नाही. यावेळेस ही नवीन पुरवठा निरीक्षक मनोज सपकाळे सहा. निरीक्षक विठ्ठल काकडे यांना निवेदन देऊन सदरच्या पेट्रोल पंपावर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे तक्रादाराने सांगितले.

Protected Content