काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार-प्रसार करणार- जलील पटेल

यावल प्रतिनिधी । वरिष्ठांच्या सहकार्याने आपल्याकडे काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली असून याच्या मदतीने पक्षाच्या प्रचार व प्रसाराचे काम करणार असल्याचे प्रतिपादन जलील सत्तार पटेल यांनी केले. ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

तालुक्यातील कोरपावली येथील पटेल समाजातील एक युवा तरूण तडफदार व उमदा नेतृत्व असलेले व्यक्तीमहत्व सामाजीक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले शेतकरी कुटुंबात जन्मलेले जलील सत्तार पटेल यांची नुकतीच महत्वाच्या पदावर निवड झाली आहे. आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व काँग्रेस कमेटीचे यावल तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पटेल यांनी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ व निष्ठावंत सामान्य कार्यकर्ता पासुन तर सरपंच म्हणुन गावपातळीवर केलेली लक्ष वेधणारी ही सर्व कार्य करीत असतांना त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांची नुकतीच काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे.

काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या माध्यमातुन जिल्हाभरात काँग्रेस पक्षाच्या वाढीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत असल्याची माहीती पटेल यांनी लाईव्ह ट्रेंड न्युजशी बोलतांना सांगीतले. युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणुन आपल्या राजकीय प्रवासाची कारर्कीद सुरू करणार्‍या जलील पटेत यांनी कोरपावली ग्रामपंचायतच्या सरपंचपदावर कार्य करीत असतांना १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन गावातील विकास करतांना त्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलला. गावाच्या अंगणवाडी संरक्षण भिंत बांधणे , स्वच्छता अभीयांना अंतर्गत महीला शौचालय दुरूस्तीची कामे , गावातील ग्रामस्थांना मुबलक पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न युद्धपातळीवर सोडविण्यासाठी नियोजन करून तात्काळ पाणी पुरवठा पाईप लाईन करण्यात यशस्वी झालेत , गावातील प्रत्येक वार्डात दिवाबत्तीच्या प्रश्‍नास अग्रभागी ठेवुन सोडविले, गावातील प्रमुख चौकांमध्ये पेव्हर ब्लॉकची कामे झालीत, आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पासाठी १० टक्के प्रशासकीय खर्च , याशिवाय एमआरईजीएसच्या अंतर्गत १६ शौचालय , तर एसबीएम अंतर्गत १६० शौचालय बांधुन गावास हगणदारीमुक्त करण्यात महत्वाचा वाटा उचलण्यात यशस्वी झाले असल्याची माहिती जलील पटेल यांनी दिली.

दरम्यान, पटेल यांच्या कोरपावली ग्रामपंचायत सरपंचपदाच्या कारकीर्दीत स्वच्छता आणि करवसुलीत तालुका पातळीवर मिळवला १० हजार रूपयांचे बक्षीस प्रथम क्रमांकाचे सन्मानपत्र अशा प्रकारे कोरपावली गावास नाव लौकीक व विकासाला नवी दिशा देणारे कार्य त्यांनी केल्याने गावाची आगळी वेगळी ओळख मिळुन देणारे जलील सत्तार पटेल यांची काँग्रेस ग्रामीण ,सेवा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे.

या संघटनेच्या माध्यमातुन पक्षात युवकांना कार्य करण्यासाठी एक चांगले व्यासपिठ व कार्य करण्याची संधी उपल्बध झाली असुन, शंभर वर्षापेक्षा अधिक चा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाने आपल्यावर विश्‍वास टाकुन सोपविलेले पद आणी जबाबदारीही मोठी असुन अल्पवधीत युवावर्ग हा पक्षात जुडू लागल्याचे काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी लाईव्ह ट्रेंड न्युजशी दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलतांना सांगीतले. यातून पक्षाचा प्रचार-प्रसार करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

Protected Content