जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे 17 ते 19 जानेवारी, 2020 दरम्यान क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन एकलव्य क्रीडा संकुल, एम.जे. कॉलेज परिसरात 17 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. चिमणराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अघ्यक्षा सौ. रंजना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सर्वश्री. चंदुलाल पटेल, गिरीष महाजन, सुरेश भोळे, संजय सावकारे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, श्रीमती लताबाई सोनवणे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, सचिव संजय घाणेकर, राजेंद्र पवार, मेरी नाशिकचे महासंचालक ना. व. शिंदे, कार्यकारी संचालक खलील अन्सारी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूरचे कार्यकारी संचालक अ. वा. सुर्वे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहिरकर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणेचे कार्यकारी संचालक (अका) खलील अन्सारी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांना शहरातील तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कलकर्णी, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता आनंदा मोरे, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणचे अधीक्षक अभियंता व प्रशासन सु, ज. वंजारी यांनी संयुक्तरित्या केले आहे.